
मी आयुष मान्यताप्राप्त प्रमाणित योग शिक्षक, गेली 4 वर्षे ऑनलाईन योगा क्लासेस घेते आहे.
-शुभांगी घुले (शतायु योगा क्लासेस)
Reviews of our classes
मी अनिता जाधव. मी योगा जॉईन करून तीन महिने झाले. आता मी पुन्हा ऑगस्ट मध्ये योगा क्लास जॉईन करणार आहे. कारण शुभांगी मॅडम खूपच छान योगा शिकवतात. शिकवण्याची पद्धत खूप छान आहे. पर्सनली प्रत्येकाकडे लक्ष देऊन सर्व आसने करून घेतात. सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. वेगवेगळ्या प्रकारे पूर्ण शरीराचा व्यायाम करून घेतात. थोडे ध्यान घेतात.. प्राणायाम घेतात. योग निद्रा घेतात.. सर्वच खूप छान शिकवतात.. पूर्ण एक तासात बरोबर सर्व पूर्ण करतात. ते मला खूप आवडते. त्याचे वेळेचे नियोजज खूप छान आहे. योगा केल्यामळे पूर्ण दिवस खूप छान प्रसन्न व आनंदी जातो. बॉडी पूर्ण हलकी वाटते.
धन्यवाद शुभांगी मॅडम
Anita Jadhav
नमस्कार, मी रेखा साळुंके. (शिक्षिका) वय 47 वर्ष. वय सांगण्याचा हेतू एवढाच आहे, की पन्नाशीकडे जाता जाता का होईना पण मला योगाची आवड लागली. याचं कारण म्हणजे मी मागे फेस योगाचा क्लास मॅडम कडे केला होता आणि त्याचवेळी त्यांना सांगितलं होतं की मी योगा क्लास ही जॉईन करेल. दिवसभर शाळा असल्यामुळे संध्याकाळी योगा केल्यानंतर अतिशय फ्रेश वाटायला लागले, शरीरही हलकं वाटतय, दहा ते 15 दिवसांमध्ये एक किलो वजन कमी झाले. कोणतेही काम करायला प्रसन्न वाटतंय आणि मी योगा करते हे पाहून माझ्या मुलांनाही बरं वाटतंय माझा मुलगा एमबीबीएस करतोय पण आई स्वतःच्या हेल्थ कडे लक्ष देते हे नुसतं ऐकूनच तो खूप आनंदी झाला. मला स्वतःला खूप छान वाटतंय. रात्री झोपण्या अगोदर मी मॅडमने सांगितल्याप्रमाणे आणि शिकवल्याप्रमाणे फेस योगा ही करते एकूणच स्वतःच्या व्यक्तीमत्वामध्ये बदल झालेला आढळला. मॅडम तुमचं खूप खूप कृतज्ञ पूर्वक धन्यवाद.
Rekha M Salunke
मी रोहिणी...
शतायु योगा क्लासेस जॉईन करून मला एक महिना पूर्ण झालेला आहे..
मी वेटलॉस फॅट लॉस साठी क्लास जॉईन केला होता आणि मला योगा एक्सरसाइज आणि जेवणामध्ये केलेले थोडेसे बदल यामुळे मला खूप चांगला रिझल्ट मिळाला आहे.
त्यामध्ये साधारण माझे एक महिन्यांमध्ये दोन किलो वजन कमी झाले आहे.
मी दररोज एक तास योगा चार किलोमीटर चालणे आणि आहारामध्ये बदल या सर्व गोष्टींमुळे हे साध्य झालेला आहे. त्यासाठी मी शतायु योग क्लासेसचे सोनाली मॅम चे मनापासून धन्यवाद व्यक्त करते.
Rohini




